शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांनी मागितली सरकारसाठी भीक, अनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष

By आनंद डेकाटे | Updated: September 21, 2023 14:24 IST

वसतिगृहे, आधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती याकडे वेधले शासनाचे लक्ष 

नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वसतिगृहे, आधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती आदी महत्त्वाच्या योजना आहेत. परंतु या योजना वित्त विभागाने अडवून ठेवल्या आहे. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी गुरूवारी भीक मागो आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. 

ओबीसी युवा अधिकार मंचातर्फे रेशिमबाग चौकात हे अभिनव भीक मागो आंदोलन गुरुवारी करण्यात आले. ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम यांनी सांगितले की, मागील ६ वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहू शकतात.

शाळा महाविद्यालये सुरू होवून ३ महिने उलटले आहेत तरी ७२०० विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृहे, २१,६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, ७५ विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत. या योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. ५२ टक्केच्या वर असलेल्या कष्टकरी, अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.  शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

या माध्यमातून मिळालेली भीक शासनाच्या वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागास मनी ऑर्डर द्वारे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनात पियुष आकरे, कृतल आकरे, रमेश पिसे, मिरा मदनकर मुकुंद अडेवार, आकाश वैद्य, अनुप खड्डकर, रजत लांजेवार, देवेंद्र समर्थ,धीरज भिसिकर पंकज सावरबांधे, निकेश पिने, नयन कालबांडे, मनीष गिरडकर, सोनू फतींग हे उपस्थित होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीagitationआंदोलनStudentविद्यार्थीnagpurनागपूर