शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिडे, एकबोटेंना का अटक होत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:43 IST

कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल करत पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे

नागपूर : कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल करत पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे, तसेच संरक्षण भिडे व एकबोटे यांना मिळत आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर राज्यात बंद पाळण्यात आला. काही आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून अनेकांना उचलून नेले. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी मंगळवारी नागपुरातील दलित, ओबीसी यासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत रविभवन येथे चर्चा केली. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये तालिबानी संघटनांनी जसा आपला प्रभाव निर्माण करून सरकारला दुबळे केले आहे.हाफीज सईदसारख्या दहशतवाद्याला तेथील सरकारच संरक्षण देत आहे. तशीच परिस्थिती भारतात निर्माण होत असून, येथे हिंदू संघटनांचा हिंसाचार वाढत आहे. भिडे व एकबोटे हे महाराष्ट्रातील हाफीज सईद असल्याची टीका त्यांनी केली.आयोग का नेमला नाही?कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आयोग नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्याची स्थापना का केली गेली नाही, असा सवाल करीत चौकशी आयोग स्थापन केला नाही तर ओबीसी समाजातील उद्रेक बाहेर येऊ शकतो. याची सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.एल्गार परिषदेत कुणीही माओवादी नव्हते आंबेडकर म्हणाले, पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत कुणीही माओवादी नव्हते. न्या. पी.बी. सावंत, न्या. बी.जी. कोळसे पाटील यांच्यासह आपणही त्या परिषदेला उपस्थित होतो. मला जर कुणी माओवादी म्हणत असेल तर हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.उमर खालीद देशद्रोही नाहीएल्गार परिषदेत उमर खालीद यांच्या उपस्थितीवरून आक्षेप घेण्यात आले, यावर आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपांतून उमर खालीद यांना मुक्त केले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्यांना परिषदेत बोलावून आयोजकांनी कोणतीच चूक केलेली नाही.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर