आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भाऊ लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:26 IST2020-03-14T00:25:11+5:302020-03-14T00:26:14+5:30
दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भाऊ लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील उपस्थित होत्या.
गेल्या वर्षी चिमूर येथे पार पहिले संमेलन झाले. दुसरे संमेलन हे नागपुरात घेतले जात आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन ११ व १२ एप्रिल रोजी होणार आहे. ११ एप्रिलला सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे खोब्रागडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला नीलेश खांडेकर, डॉ. रवींद्र तिरपुडे, सुजित मुरमाडे, डॉ. सुशील गाडेकर, प्रा. विवेक खुनकर उपस्थित होते.