भरधाव दुचाकी ट्राॅलीवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST2021-02-21T04:14:04+5:302021-02-21T04:14:04+5:30

कुही : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल ट्रॅक्टरच्या ट्राॅलीवर मागून धडकली. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना कुही ...

Bhardhaw hit the two-wheeler trolley | भरधाव दुचाकी ट्राॅलीवर धडकली

भरधाव दुचाकी ट्राॅलीवर धडकली

कुही : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल ट्रॅक्टरच्या ट्राॅलीवर मागून धडकली. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी येथील बसस्टाॅपजवळ नुकतीच घडली.

गणेश राजेराम लांबट (४५, रा. उमरेड) असे मृताचे नाव आहे. गणेश लांबट व तेजस लांबट (१६) एमएच-४०/व्ही-३३३५ क्रमांकाच्या माेटरसायकलने भूगावहून उमरेडला जात हाेते. गणेश माेटरसायकल चालवीत हाेते तर तेजस मागे बसला हाेता. दरम्यान, वडाेदा-कुही मार्गावरील सावळी येथील बसस्टाॅपजवळ यांच्या माेटरसायकलवरील ताबा सुटला आणि वेगात असलेली माेटरसायकल राेडलगतच्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीवर (क्रमांक-एमएच-४४/डी-५१३३ आणि एमएच-४४/डी-५१३४) आदळली. त्या ट्राॅलीमध्ये ऊस हाेता. या अपघातात गणेश यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के करीत आहेत.

Web Title: Bhardhaw hit the two-wheeler trolley