Bhardhaw flew the old man on a two-wheeler | भरधाव दुचाकीने वृद्धास उडवले

भरधाव दुचाकीने वृद्धास उडवले

उमरेड : भरधाव माेटारसायकलने सायकलने जाणाऱ्या वृद्धास जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-भिसी राेडवरील मांगरूळ फाटा बसस्टाॅपजवळ नुकतीच घडली.

हनुवंत गजभिये (६५, रा. मांगरूळ, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. ते सायकलने जात असताना माेटारसायकलने (क्र. एमएच-४० ई १९४५) त्यांच्या सायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी दुचाकीचालक संजय पिल्लेवान (रा. पाहमी, ता. भिवापूर) याच्या विरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मनाेज वाघ करीत आहेत.

Web Title: Bhardhaw flew the old man on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.