भरधाव बाेलेराेने महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:05+5:302021-03-04T04:12:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : भरधाव बाेलेराेने राेडच्या कडेने माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या तीन महिलांपैकी एकीचा चिरडले तर अन्य दाेन ...

भरधाव बाेलेराेने महिलेला चिरडले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : भरधाव बाेलेराेने राेडच्या कडेने माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या तीन महिलांपैकी एकीचा चिरडले तर अन्य दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-बिना संगम (ता. कामठी) मार्गावर मंगळवारी (दि. २) सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडला. हा अपघात वित्रित्र असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
गोदावरी नामदेव भुरे (४८) असे मृत तर ललिता जांगडे (५३) व करुणा जांगडे (४५) अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत. त्या तिघीही बिना संगम, ता. कामठी येथील रहिवासी आहेत. त्या मैत्रिणी असून, त्या मंगळवारी सकाळी खापरखेडा-बिनासंगम मार्गाने माॅर्निंग वाॅकला गेल्या हाेत्या. या मार्गावरील अश्विनी विद्यालयाजवळील नॅशनल ब्रिक्ससमोर भरधाव बाेलेराेने या महिलांना जाेरात धडक दिली. यात गाेदावरी बाेलेराेच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ललिता व करुणा गंभीर जखमी झाल्या.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी दाेन्ही जखमींना उपचारासाठी कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले तर ललिता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेला. जखमी दाेन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. पाेलीस निरीक्षक भटकर, सहायक पाेलीस निरीक्षक मलकुलवार, उपनिरीक्षक निमगडे, वाहतूक शाखेचे कैलास पवार यांनी घटनास्थळावरील नागरिकांची गर्दी हटवली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी ट्रक व बाेलेराे चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
....
विचित्र अपघात
काेळसा खाली करून वेगात जात हाेता. या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेती वाहतुकीच्या बाेलेराेला कट मारला. त्याचवेळी बाेलेराेचे चाक निखळल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वेगात असलेल्या बाेलेराेने या तिन्ही महिलांना धडक दिली. त्यातील एक चिरडल्या गेली तर दाेघी गंभीर जखमी झाल्या, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघात हाेताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली हाेती.