दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते सुरेई ससाई

By Admin | Updated: September 20, 2015 03:03 IST2015-09-20T03:03:00+5:302015-09-20T03:03:00+5:30

केरळ आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई ..

Bhante Surei Sasai, President of Deeksha Bhoomi Memorial Committee | दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते सुरेई ससाई

दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते सुरेई ससाई

स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय : एकमताने झाली निवड
नागपूर : केरळ आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची निवड करण्यात आली आहे.शनिवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील स्मारक समितीच्या सभागृहात स्मारक समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला समितीचे अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आजच्या समितीचा मुख्य विषय हा अध्यक्षपदाच्या निवडीचाच होता. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे नाव प्रस्तावित केले.तर डॉ. राजेंद्र गवई यांनी अनुमोदन केले. त्यानंतर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह सर्व सदस्यांनी भंते ससाई यांची एकमताने निवड केली.
याप्रसंगी भंते ससाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत दीक्षाभूमीची महत्त्वाची जबाबदारी आपण योग्यपद्धतीने पर पाडू, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य पुरुषोत्तम भागवत, मामा येवले, विजय चिकाटे, आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले, , डी.जी. दाभडे आणि एन. आर. सुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Bhante Surei Sasai, President of Deeksha Bhoomi Memorial Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.