संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना भालचंद्र मुणगेकरांचे खुले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:05 PM2019-01-08T16:05:46+5:302019-01-08T16:06:12+5:30

ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bhalchandra Mungekar's open letter to Aruna Dhhere | संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना भालचंद्र मुणगेकरांचे खुले पत्र

संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना भालचंद्र मुणगेकरांचे खुले पत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


यात ते म्हणतात,
 आदरणीय, श्रीमती अरुणाताई ढेरे,
सादर प्रणाम.
प्रत्येक वर्षी कोणत्या त्या कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वर्षी आपली बिनविरोध निवड झाली. ही मराठी जणांना सुखावणारी गोष्ट आहे.
परंतु यावेळी, साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यिका श्रीमती नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण संयोजकांनी अचानक रद्द केले आणि भानगडींची परंपरा सुरु ठेवली.
सहगल याचे निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे. सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू,हे कारण सांगून काही  झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. खरे कारण, सेहगल एक संवेदनशील साहित्यिका असल्यामुळे त्या देशातील प्रचलित वाढत्या असहीश्नुतेवर भाष्य करणार होत्या, हे आहे.
आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्वाची आहे.
आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून,साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा, आणि तो ही बिनविरोध, सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरून अध्यक्षीय भाषण करणे, हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माज्या सारख्याला या औपचारिकपणाचे महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे, प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजाकांप्रमाणेच आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखे होईल. भारतातील उदारमतवादाचे जनक असलेल्या युगपुरुष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल.
आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे.
 
आपला,
डॉ. भालचंद्र मुणगेकर

यवतमाळच्या संमेलनाचे उदघाटन कोण करणार याबाबतचा तिढा अद्यापी सुटलेला नाही. उदघाटक म्हणून कोणाला बोलवावे, याबाबत काही नावे सुचवण्याचे आवाहन साहित्य महामंडळाकडून आयोजक संस्थेला करण्यात आले. आयोजक समितीकडून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, लोकमत समूहाच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार आणि ज्येष्ठ कवी विठठल वाघ ही तीन नावे महामंडळाकडे पाठवण्यात आली आहेत.

Web Title: Bhalchandra Mungekar's open letter to Aruna Dhhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.