संपतलाल पारख स्मृतिनिमित्त भजनसंध्या

By Admin | Updated: February 2, 2015 01:05 IST2015-02-02T01:05:40+5:302015-02-02T01:05:40+5:30

संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट आणि उर्मा गर्ग फाऊंडेशनच्यावतीने समाजसेवक संपतलाल पारख यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Bhajan sadhanna | संपतलाल पारख स्मृतिनिमित्त भजनसंध्या

संपतलाल पारख स्मृतिनिमित्त भजनसंध्या

संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट आणि उर्मा गर्ग फाऊंडेशनचा उपक्रम
नागपूर : संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट आणि उर्मा गर्ग फाऊंडेशनच्यावतीने समाजसेवक संपतलाल पारख यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येत लोक सहभागी झाले होते. शंकरनगर चौक येथील साई सभागृहात हीरल कामाणी गर्ग व मुंबईच्या ताल ग्रुपच्या कलावंतांनी भजन सादर करून संपतलाल पारख यांना आदरांजली वाहिली.
या भजनसंध्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार सुधाकर देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, उद्योगपती मनीष मेहता, विनोद गर्ग, संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी प्रफुल्ल पारख, प्रसिद्ध उद्योगपती दिलीप छाजेड उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत विजयकुमार सुराणा आणि अनिल पारख यांनी केले.
कलावंतांनी भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान महावीर यांच्या आदर्शांवर आधारित एकापेक्षा एक सरस भजन सादर केले. यावेळी सभागृह रसिकांनी खच्चून भरले होते. संचालन सुनील पारख यांनी केले. या प्रसंगी प्रामुख्याने शहर काँग्रेस समितीचे महासचिव अतुल कोटेचा, काँग्रेसचे नेते अनिस अहमद, जवाहरलाल श्रीश्रीमाल, सुनील रायसोनी, राजेश लोया, पद्मेश गुप्ता, रामदयाल शर्मा, अरविंद कोटेचा, अश्विन गोलछा, नवलचंद पुुगलिया, दिलीप रांका, राजन ढड्ढा, डॉ. संजय जैन, प्रणित भंडारी, संजय पुगलिया, संजय नाहटा, अशोक बंग, कमल कोठारी, विजय रामानी, महेन्द्र कटारिया, विपीन कामदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१२०० जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट आणि उर्मा गर्ग फाउंडेशनच्यावतीने संपतलाल पारख यांच्या स्मृतिनिमित्त हनुमान मंदिर, सदर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १२०० लोकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमात पारख परिवाराने सहकार्य केले.

Web Title: Bhajan sadhanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.