भीषण अपघातात तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:40 IST2017-07-30T00:39:53+5:302017-07-30T00:40:33+5:30

भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.

bhaisana-apaghaataata-taina-jana-thaara | भीषण अपघातात तीन जण ठार

भीषण अपघातात तीन जण ठार

ठळक मुद्देचौघे जखमी : ट्रॅव्हल्सची आॅटोला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे शनिवारी (दि. २९) रात्री ८.५० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कमलाबाई मधुकर पालेकर (७५), उमेश विनायक दहीकर (२५) आणि आॅटोचालक गजानन पांडुरंग चांदूरकर (४०) सर्व रा. माळेगाव (टाऊन) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये राजेंद्र मधुकर पालेकर (४०), अर्चना राजेंद्र पालेकर (३५), पारस राजेंद्र पालेकर (५) आणि सुनील चांदूरकर (२५) सर्व रा. माळेगाव (टाऊन) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सावनेरच्या शासकीय रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे.
एमएच-४०/१३९२ क्रमांकाच्या आॅटोने सर्वजण माळेगाव (टाऊन) येथे जात होते.
सावनेरकडून माळेगावकडे आॅटोने वळण घेताच नागपूरकडून सावनेर दिशेने येणाºया एमपी-२८/सी-०३०१ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला जबर धडक दिली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच नागरिकांनी सावनेरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथे गजानन चांदूरकरचा मृत्यू झाला. जखमी सर्वांवर प्रथमोपचार करून मेडिकलमध्ये हलविण्यास वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. त्यानुसार सर्वांना नागपूरच्या मेडिकलमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, अपघात होताच संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स पेटविली. पाहता - पाहता आगीने अख्खी ट्रॅव्हल्स भस्मसात झाली. यावेळी सावनेर पोलीस घटनास्थळी असून काहीच करू शकले नाही. जमावासमोर पोलिसांचे काहीएक चालले नाही. ट्रॅव्हल्स विझविण्यासाठी सावनेर नगर परिषदेचे अग्निशमन दल आले असता नागरिकांनी त्यांच्या दिशेने गोटमार करून अग्निशमन दलाचा विरोध करीत त्यांना परत पाठविले. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळाहून पसार झाला.

Web Title: bhaisana-apaghaataata-taina-jana-thaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.