शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाई राखी ‘इंडियन’ है क्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 21:33 IST

बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे.

ठळक मुद्देमहिलांची खरेदीवेळी दुकानदारांना विचारणा : चीनविरुद्ध संताप, राख्या २० टक्के महाग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. तरुणी आणि महिला खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. ‘भाई राखी इंडियन है क्या’ असा पहिला प्रश्न महिला दुकानात पाय ठेवताच विचारत आहेत. भारतीयांमध्ये चीनविरुद्ध असलेला संताप यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चा बोलबालायावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी १५ दिवसापूर्वी बाजारात राख्यांची दुकाने पाहायला मिळत आहे. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या आहेत. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत आहे. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे. मुलांसाठी कार्टुन कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध आहेत. यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्या आहेत. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, आर्टिफिशियल डायमंड राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहेत. कोरोनामुळे तरुणी आणि महिला खरेदीसाठी कमी संख्येने घराबाहेर येत असल्या तरीही सणाच्या दोन वा तीन दिवसाआधी खरेदीला उत्साह राहील, असे इतवारी, शहीद चौकातील विकास जैन या विक्रेत्याने सांगितले.बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्रीव्यापारी राजू माखिजा म्हणाले, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे, ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाऱ्यांनी बोलविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी आहे. सध्या २५ टक्केही व्यवसाय झाला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.५ कोटींचा व्यवसाय यंदा २ कोटीवर!नागपुरातून संपूर्ण विदर्भात राख्यांची विक्री होते. ठोक व्यवसाय एक महिन्यापूर्वीच सुरू होतो. पण यावर्षी कोरोनाचे संकट पाहता व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली नाही. ऑड-इव्हनमुळे किरकोळ दुकानदारांनीही माल पडून राहण्याऐवजी हव्या तेवढ्याच राख्यांची खरेदी केली. याशिवाय गावखेड्यांमध्येही बाजार भरविण्यावर बंदी आहे. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनीही यावर्षी खरेदी थांबविली आहे. शहरातील आणि तालुका स्तरावरील फेरीवाल्यांनीही थोड्याच मालाची खरेदी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे गेल्यावर्षी जवळपास ५ कोटींच्या तुलनेत यंदा २ कोटींच्या व्यवसाय होण्याची शक्यता आहे. महिला दोन-चार दिवसापूर्वी राख्यांची खरेदी करतील, असे राजू माखिजा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RakhiराखीIndiaभारत