शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रमाने घडविले नागपूरच्या भाग्यश्रीने भाग्य; नागालॅण्ड सरकारमध्ये गृहविभागाच्या उपसचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 10:08 IST

तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव.

ठळक मुद्देआव्हानांचा थेट सामना

लोकमत न्यूज नेटवर्क

 शफी पठाण

नागपूर; ज्याच्याकडे स्वप्ने नाहीत तो तरुणच नाही, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. म्हणूनच तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. तिचे हे परिश्रम अखेर कामी आले आणि आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव.जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वात कठीण परीक्षा तिने पास केली आहे. समाज व देशासाठी काहीतरी करण्याची संधी भारतीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून मिळते, हे भाग्यश्रीला चांगले माहीत होते. कारण, या सेवेबद्दल वडिलांनीच तिला लहानपणापासून प्रोत्साहित केले होते. त्या दिशेने तिने प्रवास सुरू केला. शिक्षण, नोकरी, आई व स्वत:चे आजारपण यावर मात करून रणरागिणीप्रमाणे लढत २०१२ च्या युपीएससी परीक्षेत यश संपादन केले. जन्म नागपूर जिल्ह्यातील असला तरी, शिक्षण अमरावती, यवतमाळ येथे झाले. मोर्शी सारख्या तालुक्यात युपीएससी, एमपीएससीची माहितीच कुणाला नव्हती. सुरुवातीला एमपीएससीची तयारी केली. त्यातून सेलटॅक्समध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्या. परंतु त्यांची कुशाग्र बुद्धी, जिद्द, परिश्रम घेण्याची तयारी, मोठे प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर त्या युपीएससीच्या तयारीला लागल्या. वडिलांचे अचानक जाणे त्यांच्या प्रयत्नात मोठाच आघात होता. आईची सातत्याने खराब होत असलेली प्रकृती, घर सांभाळणे आणि अवघड असलेली परीक्षेची तयारी असे चौतर्फी आव्हान समोर उभे होते. पण, त्या माघारी फिरल्या नाहीत. या आव्हानांना थेट भिडल्या. खंबीरपणे त्यांचा सामना केला आणि नागालॅण्ड कॅडरमध्ये नियुक्त झाल्या. आज त्या नागालॅण्ड सरकारमध्ये गृहविभागाच्या उपसचिव म्हणून सेवा देत आहेत. निव्वळ अभ्यासूवृत्तीच नाही, तर उत्तम लेखक, कवी आहेत. त्यांचा स्वप्नगंध हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातून आल्याने सामाजिक जाणीव त्यांना आहे. विदर्भातील जास्तीत जास्त मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या जातात. त्यांच्यासाठी शिबिर घेतात. नागालॅण्ड सरकारमध्ये कार्यरत असताना तेथील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना किती सक्षमतेने राबविता येईल, यासाठी दक्ष असतात. भाग्यश्री बानाईत- धिवरे यांच्या कर्तृत्वाला आजच्या महिला दिनी आमचा सलाम.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस