भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार

By Admin | Updated: September 5, 2015 03:20 IST2015-09-05T03:20:12+5:302015-09-05T03:20:12+5:30

इंदोरा बुद्ध विहाराचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८१ वा वाढदिवस इंदोरा बुद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला.

Bhadan Arya Nagarjuna Suryai Sasai felicitated | भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार

नागपूर : इंदोरा बुद्ध विहाराचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८१ वा वाढदिवस इंदोरा बुद्ध विहारात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. मधुकर वासनिक आणि अ‍ॅड. राजेंद्र पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यासोबतच शंकररव गडपायले, कलावती गडपायले यांनी आणि परिवाराने दिलेल्या १० लाख रुपयांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद माने, प्रा. रणजित मेश्राम, प्रा. डॉ. भाऊ लोखंडे, नगरसेवक मुरलीधर मेश्राम,
नगरसेविका किरण रोडगे, इंदोरा विहाराचे सचिव अमित गडपायले, सहसचिव अरुण नागदिवे, सुनील अंडरसहारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर धमगाये, अ‍ॅड. अजय निकोसे, विजय इंदूरकर, विक्रांत गजभिये, आनंद राऊत, रोशन उके, संदीप कोचे, सिद्धार्थ घरडे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bhadan Arya Nagarjuna Suryai Sasai felicitated