नरखेड तालुक्यात सट्टापट्टीचा धंदा जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:36+5:302021-02-05T04:42:36+5:30
जलाल खेडा : नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधधंद्यांना उत आला आहे. अनेक गावांमध्ये सट्टापट्टीचा अवैध धंदा सुरु आहे. या ...

नरखेड तालुक्यात सट्टापट्टीचा धंदा जोमात
जलाल खेडा : नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधधंद्यांना उत आला आहे. अनेक गावांमध्ये सट्टापट्टीचा अवैध धंदा सुरु आहे. या बाबत पोलीस स्टेशन जलाल खेडा येथे ८ डिसेंबरला तक्रार सुद्धा करण्यात आली होती. परंतु तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही. उलट सट्टापट्टीचा धंदा आणखीन खुलेआम सुरु झाला. त्यामुळे अशा या अवैध धंदे करणाऱ्यांना कसलीही भीती राहिलेली नाही. जलाल खेडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. बाजारपेठेमुळे येथे नेहमी वर्दळ असते. मात्र येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या सट्टापट्टीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या अवैधधंद्यांना अभय कोणाचे असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. जलाल खेडा, भारसिंगी, भिष्णूर, थंडीपवनी, अंबाडा, सायवाडा, मोवाड, नरखेड अशा अनेक गावांमध्ये सुरु असलेला सट्टापट्टीचे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहे.