मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड

By Admin | Updated: May 18, 2016 03:20 IST2016-05-18T03:20:27+5:302016-05-18T03:20:27+5:30

जरीपटक्यातील कुख्यात बुकी दिलीप नानकराम कुकरेजा आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येणाऱ्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर...

Betting in betting at Manish Nagar | मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड

मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड

चार बुकी जेरबंद : सोनेगाव पोलिसांची कारवाई
नागपूर : जरीपटक्यातील कुख्यात बुकी दिलीप नानकराम कुकरेजा आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येणाऱ्या मनीषनगरातील सट्टा अड्ड्यावर धाड घालून सोनेगाव पोलिसांनी बुकी कुकरेजा तसेच त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून २ कलर टीव्ही, २ लॅपटॉप, ३६ मोबाईल फोन, १ प्रिन्टर,९ मोबाईल चार्जर तसेच खायवाडीचे रजिस्टर आणि ३ दुचाक्यांसह ३ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जरीपटका (कच्छा) येथील दिलीप कुकरेजा आणि त्याचे साथीदार गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टा अड्डा चालवतात. एकेका मॅचवर ते करोडोंची खायवाडी करतात. जरीपटका, पाचपावली, धरमपेठ, यशोधरानगर, वाडी, एमआयडीसी,प्रतापनगरसह अनेक परिसरात त्यांचे पॉश अड्डे आहे. न्यू मनीषनगरातील नेक्स्ट अल्टिमेट अपार्टमेंटमध्ये त्यांनी अड्डा सुरू केला होता.
त्याची माहिती कळताच सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने तेथे धाड घालून बुकी कुकरेजा, रवी पवनदास गुरवाणी (वय ३२, रा. खामला), कमल ग्यानचंद आसवाणी (वय ३५, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जरीपटका), जय किशोर मघराणी (वय २३, रा. खामला) हे सर्व आयपीएलच्या कोलकाता नाईटरायडर विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगळुरु दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर क्रिकेट सट्ट्याची खायवडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून उपरोक्त साहित्य जप्त केले.
पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, सहायक आयुक्त शेखर तोरे, ठाणेदार अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार वसंता नारखेड, नायक ज्ञानेश्वर बांते, ललित तितरमारे, अनिल झाडे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)

Web Title: Betting in betting at Manish Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.