ओळखीच्यानेच केला विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:38+5:302021-07-19T04:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वाहने विकण्याचा साैदा करून साडेतीन लाख रुपये घेतल्यानंतर वाहनमालकाने घूमजाव केले. ठरल्याप्रमाणे खरेदीदाराला वाहनेही ...

ओळखीच्यानेच केला विश्वासघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वाहने विकण्याचा साैदा करून साडेतीन लाख रुपये घेतल्यानंतर वाहनमालकाने घूमजाव केले. ठरल्याप्रमाणे खरेदीदाराला वाहनेही दिली नाही अन् रक्कमही परत केली नाही. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
भूषण रवींद्र पांडे (वय ३०)असे आरोपीचे नाव आहे. तो अशोक चाैकाजवळ राहतो. मोहम्मद मुजम्मिल मोहम्मद मुस्तफा (वय ५९) हे वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी २६ जानेवारी २०२१ ला आरोपी पांडेसोबत फोर्च्युनर, अर्टिगा आणि अन्य एक असे तीन वाहने खरेदी करण्याचा साैदा केला होता. ॲडव्हॉन्स म्हणून मुजम्मील यांनी पांडेच्या बँक खात्यात ३ लाख, ५० हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यापासून पांडेने शब्द फिरवले. वाहन देण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. रक्कमही परत केली नाही. त्यामुळे मुजम्मील यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.
---