लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५

By Admin | Updated: November 11, 2015 02:17 IST2015-11-11T02:17:51+5:302015-11-11T02:17:51+5:30

खऱ्या अर्थाने ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे.

The best time for Lakshmi Pooja is at 7.30 to 10.45 | लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५

लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५

भाऊबीज दुपारी आणि रात्रीही साजरी करू शकता
नागपूर : खऱ्या अर्थाने ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे. धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरी करण्यात आली. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे.
लक्ष्मीपूजन निश्चित वेळेनुसार केल्यास ज्योतिष्यशास्त्रात शुभ मानले जाते. रात्री ७.३० ते १०.४५ दरम्यान लक्ष्मीपूजन केल्यास शुभ राहील असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. ११ नोव्हेंबरला रात्री ११.१४ ला अमावस्येची समाप्ती आहे. ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी काळसर व पिवळसर रंगछटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरेल.
हा दिवस आर्थिक उलाढाली, धार्मिक बाबी व दानधर्मासाठी अनुकूल राहील. पांडुरंगाची उपासना, लक्ष्मी-विष्णूची उपासना तसेच कुबेराचे पूजन करतात. लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५ आहे. १२ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा दिवस सर्वच राशीच्या लोकांना अनुकूल अहे. श्रीदत्तात्रय व अग्निउपासना लाभकारी राहील. भाऊबीज शुक्रवारी १३ नोव्हेंबरला आहे. हा दिवस अतिशय मंगलकारी आहे. काळसर व फिकट निळा रंगछटांचा वापर उपकारक ठरेल. भाऊबीजेसाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १२.१५ ते १.३५ व रात्री ९.५ ते १०.३५ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The best time for Lakshmi Pooja is at 7.30 to 10.45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.