‘बेस्ट लक’ नोटा ठरल्या बिनकामाच्या

By Admin | Updated: November 17, 2016 03:12 IST2016-11-17T03:12:23+5:302016-11-17T03:12:23+5:30

अमिताभ बच्चनच्या कोण्या एका चित्रपटात ७८६ या क्रमांकाचे महत्त्व अधोरेखित करणारे दृश्य दाखविले होते

'Best Luck' Nota Decline Binakama | ‘बेस्ट लक’ नोटा ठरल्या बिनकामाच्या

‘बेस्ट लक’ नोटा ठरल्या बिनकामाच्या

७८६ क्रमांकाच्या नोटा संग्रहकर्त्यांचा हिरमोड : खिन्न मनाने नोटा बदलण्याची वेळ
नागपूर : अमिताभ बच्चनच्या कोण्या एका चित्रपटात ७८६ या क्रमांकाचे महत्त्व अधोरेखित करणारे दृश्य दाखविले होते आणि एका रात्रीत हा क्रमांक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. नशिबाची जोड लाभते म्हणून या क्रमांकाशी संबंधित वस्तू संग्रहित करण्याचे काम लोकांनी केले. मग या क्रमांकाच्या चलनी नोटाही लोकांच्या संग्रहाचा भाग झाल्या. परंतु १०००, ५०० च्या नोटा बदलण्याच्या निर्णयाने एका रात्रीत ‘बेस्ट लक’चे प्रतीक असलेल्या या नोटा बिनकामाच्या झाल्या आणि अनेक वर्षांपासून या नोटा संग्रह करणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
७८६ या क्रमांकाचा संबंध पावित्र्याशी आणि नशिबाशी जोडला जातो. त्यामुळे मुस्लिमच नाही तर प्रत्येक धर्मीयांमध्ये या क्रमांकाविषयी विशेष आस्था बाळगली जाते. हा क्रमांक बेस्ट लक ठरतो म्हणून अनेकांना या क्रमांकाच्या चलनी नोटा जमा करण्याचा छंदही जोपासला आहे. पंजाबी लाईन, रेल्वे क्वॉर्टर या वस्तीत राहणारे गोपाल राव हे त्यातीलच एक छंदिस्ट. तसा त्यांना लहानपणापासूनच महापुरुषांचे छायाचित्र असलेले शिक्के व विशेष क्रमांकाच्या नोटा गोळा करण्याचा छंद आहे. हा ठेवा त्यांच्या संग्रही आहे. मात्र ७८६ क्रमांकाच्या नोटांवर त्यांची विशेष आस्था.
या क्रमांकाच्या १ रुपयापासून १००० पर्यंतच्या जवळपास ४० हजार रुपयांच्या नोटा त्यांच्याजवळ आहेत. त्यातही ५०० च्या ४७ आणि १००० च्या ८ अशा ३१ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्याजवळ आहेत. अगदी अटीतटीच्या वेळीही गोपाल यांनी या नोटांना हात लावला नाही व इतर उपाय करून आपली गरज भागविली होती.
मात्र सरकारच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाने अनेक वर्षांपासून त्यांच्याजवळ ‘बेस्ट लक’ म्हणून असलेल्या नोटा एका रात्रीत ‘बॅड लक’ ठरल्या आहेत. आस्था आपल्या जागी असली तरी अर्थशास्त्र महत्त्वाचे हा व्यवहार त्यांना माहीत आहे.
मात्र एवढ्या वर्षांत एकेक करीत गोळा केलेले हे धन आता कुठल्याही कामाचे राहिले नाही, या विचाराने त्यांचे अंत:करण जड झाले आहे. एवढ्या वर्षांत जोपासलेला हा ठेवा नाईलाजाने बदलावाच लागेल, हा विचार गोपाल राव यांना उदास करीत आहे. (प्रतिनिधी)

फॅन्सी नंबर नोटा संग्रहकर्त्यांचा हिरमोड
इतक्या वर्षात एक एक करून या नोटा गोळा केल्या आहेत. या नोटांसोबत मन जुळले आहे. अगदी कठीण प्रसंगीही त्या नोटा खर्च केल्या नाहीत. मात्र नोटबंदीच्या निर्णयाने या नोटांना किंमतच उरली नाही. नाईलाजाने या नोटा बदलाव्या लागणारच आहेत. मात्र या नोटा बँकेत जमा करताना अतीव दु:ख होत आहे. एवढे वर्ष संग्रह केल्याने आजही बदलण्याची इच्छा होत नाही.
- गोपाल राव, संग्रहकर्ता

Web Title: 'Best Luck' Nota Decline Binakama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.