लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई पॅटर्नने बेसा नगर पंचायतचा विकास केला जाईल. पाच वर्षांत एकही विकासकामे शिल्लक राहणार नाही. हा परिसर नागपूर शहराला वेगळी ओळख देईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बेसा नगर पंचायतील वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उपस्थित राहून या सोहळ्याचे कौतुक केले. कॉमेडी मालिका 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय इंडियन आयडॉल फेम अबोली गिहेन, आतिश तेलन्या यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील गाण्यांनी संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले.
बेसा सर्वात सुंदर नगर पंचायत होणार
- बेसा नगरपंचायत अंतर्गत गेल्या २ वर्षांत ८० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन याशिवाय अन्य विकासकामांवर ही रक्कम खर्च करण्यात आली.
- बेसा नगर पंचायतला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी सांगितले.
- कार्यक्रमाला बिडगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी विनायक पुगे, बहादुरानगर पंचायत मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांचीही उपस्थिती होती.