शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

तेरा हजारावर दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ : रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:53 IST

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील १३ हजार २८७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अनुदानाची रक्कम बँकेमार्फत वितरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्दे२ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये थेट बँक खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील १३ हजार २८७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अनुदानाची रक्कम बँकेमार्फत वितरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिली.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी संजय गांधी निराधार योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा लाभ देण्यात येते. नागपूर शहरात या योजनेंतर्गत ५ हजार ९५ लाभार्थी आहेत. तर ग्रामीण भागात ८ हजार १९२ लाभार्थ्यांची संख्या असून या लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे एकत्रित अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तीनही महिन्यातील एकत्रित अनुदान दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी सांगितले.नागपूर शहरात ५ हजार ९५ दिव्यांग लाभार्थ्यांचे त्यांना तीन महिन्याकरिता प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे ३ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ८ हजार १९२ लाभार्थ्यांची संख्या असून या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातील प्रती महिना १ हजार रुपये याप्रमाणे २ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजना निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ उद्देशाने १९८० पासून राज्यात राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी