कन्या वन समृद्धी याेजना लाभार्थ्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:52+5:302021-07-04T04:06:52+5:30
काटाेल : सामाजिक वनीकरण कार्यालय काटाेल यांच्यावतीने गाेन्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ...

कन्या वन समृद्धी याेजना लाभार्थ्यांचा गाैरव
काटाेल : सामाजिक वनीकरण कार्यालय काटाेल यांच्यावतीने गाेन्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाय, कन्या वन समृद्धी याेजनेच्या लाभार्थ्यांचा गाैरव करण्यात आला.
कन्या वन समृद्धी याेजनेंतर्गत गाेन्ही (ता. काटाेल) येथील १० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या लाभार्थ्यांचा गाैरव करून त्यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. त्यांना फळझाडे व सागवान राेपटे भेट देण्यात आले. लाभार्थ्यांच्या लहान मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले. याप्रसंगी विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) गीता नन्नावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. उईके, वनरक्षक एम. आर भस्मे, वनमजूर डी. एन. गायकवाड, गोन्हीचे उपसरपंच प्रशांत मुरोलीया, मुख्याधापक धीरज लाड, रोजगार सेवक वीरेंद्र पडोलिया यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.