शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

बेलगाम स्कूल बसला आवरणार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:51 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली.

ठळक मुद्दे१५६ वाहने नियमबाह्य : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. यातून लाखो रुपयांचा महसूलही मिळाला. परंतु त्यानंतरही नियमांना धुडकावून शेकडो स्कूल बस व व्हॅन रस्त्यावर धावत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओनेही याला आता गंभीरतेने घेत कारवाईची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाºया स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली. या नियमानुसार शहरात स्कूल बस व व्हॅनचा वेग ताशी ४० कि.मी. तर ग्रामीण भागात ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असता कामा नये असे नियम घालून दिले. यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग गतिरोधक) बसविण्याची सक्ती केली. परंतु काही स्कूल बस व व्हॅन चालक या स्पीड गव्हर्नरमध्ये गडबड करून वेग वाढवून घेतात व जास्त पैशांच्या लोभापायी जास्तीत जास्त फेºया मारतात. आरटीओच्या तपासणीत दोषी आढळून येणाºया अशा स्कूल बस व व्हॅनवर जप्तीची कारवाई केली. मोटार वाहन निरीक्षकांसमोर नवीन स्पीड गव्हर्नर लावून नंतरच वाहन सोडून देण्यात आले. परंतु पुन्हा-पुन्हा या यंत्रात गडबड करीत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. परिणामी, आजही शेकडो स्कूल बस व व्हॅन बेलगाम धावत आहेत. या शिवाय नियमानुसार स्कूल बसमध्ये मदतनीस आवश्यक आहे. लहान मुले व विद्यार्थिनींच्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवण्याचा नियम आहे, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या नावाची यादी व पालकांचे संपर्क क्रमांक, वाहनात शाळेची दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्था असणे, आपत्कालीन दरवाजा असणे, वाहनाच्या दरवाज्यास चाईल्ड लॉक असणे, प्रथमोपचाराची पेटी असणे, वाहनामध्ये धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसविणे, वाहनामध्ये अग्निशमन यंत्र आसन क्षमतेनुसार असणे, विद्यार्थ्यांना चढताना व उतरताना आधारासाठी दरवाजाजवळ लोखंडी दांडा असणे यासारखे अनेक नियम आहेत. परंतु यातील बहुसंख्य नियम काही स्कूल बस व व्हॅनचालक पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत.ग्रामीणतर्फे ७७ तर शहरतर्फे ७९ वाहनांवर कारवाईनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातर्फे एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान ७७ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून २ लाख ६८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शहर आरटीओ कार्यालयातर्फे याच कालावधीत ७९ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कारवाईचा वेग वाढविणारनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बस व व्हॅन तपासणी कारवाई वेळोवेळी केली जाते. या महिन्यापासून या कारवाईला आणखी गती देण्यात येईल. दोषी आढळून येणाºया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही वायु पथकांना देण्यात आले आहे.-श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी,नागपूर ग्रामीण