शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बेलानीच्या कार्यालयाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:22 IST

प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधाने या विभागाने बेलानीच्या नावाने एक नोटीस पाठवून औषध निर्मितीचे स्रोत विचारल्याचीही माहिती आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध विक्री विभाग सक्रिय : प्रतिबंधित ड्रग्जच्या विक्रीचा आरोप, नोटीसही बजावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधाने या विभागाने बेलानीच्या नावाने एक नोटीस पाठवून औषध निर्मितीचे स्रोत विचारल्याचीही माहिती आहे.जरीपटक्यात राहणाऱ्या बेलानीचे सेंट्रल एव्हेन्यूवर कार्यालय आहे. गेल्या काही वर्षांपासून बेलानीने विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज तयार करून ते देश-विदेशात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. प्रतिबंधित असलेल्या युरोप, अमेरिकेत ही औषधे मोठ्या प्रमाणात बेलानी निर्यात करू लागला. भारतातून आयात होत असलेल्या प्रतिबंधित औषधांचा अमेरिकेत वापर वाढल्याने अमेरिकन तपास यंत्रणांनी या औषधांची तपासणी केली. प्रतिबंधित औषधांमधील कंटेन्ट (घटकद्रव्य) नाव आणि प्रमाण बदलून येत असल्याचे लक्षात येताच, हे औषध पाठविणाऱ्या निर्यातकांचा एफबीआयने पत्ता लावला. बेलानीचे नाव-पत्ता कळताच एफबीआयने बेलानीला समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, समन्सला बेलानीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने एफबीआयने बेलानीला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला. त्याला एका औषध विक्रेत्याच्या माध्यमातून झेक रिपब्लिकनमध्ये बोलवून घेतले आणि तो निशांत सातपुते नामक साथीदारासोबत ३ जूनला पोहचताच त्याला एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे वृत्त सोमवारपासून उपराजधानीत वायुवेगाने पसरले. त्यामुळे बेलानीचे भागीदार आणि त्याच्याकडे काम करणारेही पळून गेले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेलानीच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे समजते. बेलानीला एक नोटीस पाठवून हे औषध तयार करण्याचे, विकण्याचे आणि निर्यात करण्याच्या परवान्याबाबतही त्याला विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.वकिलांचे पथक जाणार१२ जुलैला बेलानीच्या अटकेच्या कारवाईच्या संबंधाने झेक रिपब्लिकनमधील न्यायालयात सुनावणी आहे. त्याची बाजू मांडण्यासाठी नागपुरातील वकिलांचे एक पथक कागदपत्रांसह पुढच्या आठवड्यात झेक रिपब्लिकनसाठी रवाना होणार असल्याची माहिती सबंधित सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर