शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:03 IST

सोमवारपासून जिल्हा परिषद व पं.स.च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व वित्त विभागाच्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांच्या १४ बदल्या समुपदेशनाने झाल्या आहेत. तर इतर विभागाच्या बदल्या ६ जूनपर्यंत होणार आहे. ७ जून रोजी पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी वर्ग ३ प्रवर्गाच्या झाल्या १४ बदल्यासंघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूट देण्यावरून संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारपासून जिल्हा परिषद व पं.स.च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व वित्त विभागाच्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांच्या १४ बदल्या समुपदेशनाने झाल्या आहेत. तर इतर विभागाच्या बदल्या ६ जूनपर्यंत होणार आहे. ७ जून रोजी पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे.यावर्षी बदल्यांमध्ये कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बदलीतून सूट देण्यात येणार नाही. त्यासंदर्भात शासनाने १७ नोव्हेंबर २ ०१८ च्या शासन निर्णयाचा दाखला दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अलिखित वर्गवारीत २२ संघटना आहे़ संघटनांचा पदाधिकारी असल्यास बदलीत पाच वर्षांची सवलत मिळते़ मागील वर्षी अशाच सवलतींवरून राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास खात्याकडे धाव घेतली होती़ त्यावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या कुठल्याही कर्मचारी संघटनेला शासन मान्यता नसल्याचे कळविले़ तसेच १५ मे २०१४ च्या आदेशानुसार जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये अशा संघटनेला विशेष सवलत घेण्याचा अधिकार राहत नाही, असे स्पष्ट बजाविले आहे़ पण सोबतच केवळ मान्यताप्राप्त संघटनेलाच सवलतीचे अधिकार आहे, असेही स्पष्ट केले. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत वित्त विभागातील एका कर्मचाऱ्याला बदलीतून सूट मिळाल्यासंदर्भात आक्षेप घेण्यात येत आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असल्याने तो बदलीतून सूट मिळण्यास पात्र ठरत आहे. जि.प. कर्मचारी संघटनांना औद्योगिक न्यायालयातून मान्यता मिळेलजि.प. कर्मचारी संघटनांना मान्यता देण्यासंदर्भात वाद निर्माण झाले होते. त्यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयातून अभिप्राय मागविण्यात आले होते. यात कामगार आयुक्तांनी औद्योगिक न्यायालयातून जि.प. कर्मचारी संघटनांना मान्यता मिळविता येईल, असे स्पष्ट केले होते. शासनाने कामगार आयुक्तांचा अभिप्राय व विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायावरून जि.प. कर्मचारी संघटना औद्योगिक न्यायालयातून मान्यता प्राप्त करून घेऊ शकता, असे पत्र अवर सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. पण जि.प. प्रशासनाने या निर्णयासंदर्भात कर्मचारी संघटनांना अवगत केले नसल्यामुळे मंजुरीच्या प्रक्रियेबाबत संघटना अनभिज्ञ होत्या. आता बदली प्रकरणात या बाबीची माहिती झाल्यामुळे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बदलीतून एक वर्षाची सूट देणे प्रशासनाला बंधनकारक आहे. पण एका वर्षात संघटनांनी औद्योगिक न्यायालयातून मान्यता न मिळविल्यास पुढच्या वर्षी प्रशासन कारवाई करू शकते.संजय धोटे, कार्याध्यक्ष, जि.प. कर्मचारी महासंघ डॉक्टरांच्याही बदल्यालोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आचारसंहिता संपताच राज्य शासनाने राज्यभरातील ४१२ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. यात जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील एकूण आठ डॉक्टरांचा समावेश आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरEmployeeकर्मचारीTransferबदली