पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला

By Admin | Updated: May 20, 2015 02:55 IST2015-05-20T02:55:40+5:302015-05-20T02:55:40+5:30

नागपूर मेट्रो रेल्वेची १८ मे रोजी उघडणाऱ्या पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला आहे. कंपनीने पहिली आॅनलाईन निविदा १८ एप्रिलला जारी केली होती.

The beginning of the first tranche was avoided | पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला

पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला

मेट्रो रेल्वे : आठवड्यात निविदा उघडणार
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेची १८ मे रोजी उघडणाऱ्या पहिल्या निविदेचा मुहूर्त टळला आहे. कंपनीने पहिली आॅनलाईन निविदा १८ एप्रिलला जारी केली होती.
जवळपास ८० कोटी रुपयांच्या निविदेत सहा जणांनी रुची दाखविली होती. त्यांचे कागदपत्रेही प्राप्त झाली आहेत. त्या आधारावर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन तांत्रिक मूल्यांकनाचे काम करीत आहे. हे कार्य चार ते पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. अशा स्थितीत या आठवड्याच्या अखेरपर्यंत मेट्रो रेल्वेची पहिली आॅनलाईन निविदा उघडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहितीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही. प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ८० कोटी रुपयांची पहिली आॅनलाईन निविदा काढण्यात आली होती. वर्धा रोडवर विमानतळ विभागात शिवणगाव रोड ते मिहानपर्यंतच्या ४.५ कि़मी. क्षेत्रात ५ फूट उंच सुरक्षा भिंत, दोन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर मेट्रो रेल्वे धावण्यासाठी सुरक्षा भिंतीमध्ये ट्रॅक टाकण्यात येईल. यासाठी विमानतळ विकास कंपनीकडून एनएमआरसीएलला सुमारे ३७ हेक्टर जमीन मिळाली. निर्माण कार्यासाठी मार्किंग केली आहे. (प्रतिनिधी)
जूनपर्यंत सल्लागारांची नियुक्ती
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेट्रो रेल्वेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे सूतोवाच नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी नुकतेचे केले होते. यासाठी राईट्स आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला अंतर्गत सल्लागार नियुक्त केले आहे. राईट्स सल्लागाराच्या नियुक्तीसाठी कार्यरत आहे.

Web Title: The beginning of the first tranche was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.