बाहेर तृतीयपंथी म्हणून भीक मागतो, घरी मुलीवरच अत्याचार करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:41+5:302021-09-26T04:08:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एका विकृत व्यक्तीने स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या ...

Begging outside as a third party, abuses the girl at home | बाहेर तृतीयपंथी म्हणून भीक मागतो, घरी मुलीवरच अत्याचार करतो

बाहेर तृतीयपंथी म्हणून भीक मागतो, घरी मुलीवरच अत्याचार करतो

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एका विकृत व्यक्तीने स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या विकृताने आपल्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा बोभाटा झाला. त्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे.

संज्या हा नराधम ४० वर्षांचा आहे. तो कामचुकार तर आहेच त्याला विविध विकृतीही जडली आहे. तो तृतीयपंथियांचा वेष करून घरून बाहेर पडतो आणि रस्त्यावर पैसे मागतो. ‘दुसरेही सावज’ शोधतो. घरच्या महिलांसोबतही त्याचे वर्तन विकृतच असल्याने त्याची आणि त्याच्या भावाची पत्नी अशा दोनही महिला संज्याच्या विकृतीला कंटाळून निघून गेल्या. त्यामुळे संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ, भावाचा ७ वर्षीय मुलगा आणि वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमधील घरात राहतात. संज्याचा भाऊ चाैकीदारी तर आई घरगुती काम करते. हे दोघे बाहेर गेल्यानंतर नराधम संज्या स्वत:च्या मुलीवर आणि पुतण्यावर वासना शमवत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजता अचानक संज्याची वृद्ध आई घरी परतली. तिने दार ढकलून बघताच विवस्त्रावस्थेतील नराधम चिमुकलीवर अत्याचार करताना दिसला. बाजूला सात वर्षीय चिमुकला होता. वृद्धेने आरोपी संज्याला लाथ घालून दूर केले आणि शिवीगाळ करून दोन्ही नातवांना घराबाहेर आणले. वृद्धा संतापाच्या भरात शिवीगाळ करताना बघून शेजाऱ्यांनी चाैकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. शेजारच्यांनी वृद्धेला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वृद्धा दोन्ही चिमुकल्या नातवांना घेऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. ठाणेदार सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संतापजनक प्रकार ऐकून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.

---

शेजाऱ्यांचा संताप अनावर

चिमुकली आणि चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. हा नराधम या दोघांची अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करायचा. त्यांना मारहाणही करायचा. त्यामुळे हे बिचारे लहानगे गप्प राहायचे. पोलिसांनी त्यांना बोलते केले असता त्यांनी आपल्या बोबड्या भाषेत या नराधमाची विकृती कथन केली. ती ऐकून काही वेळेसाठी शेजाऱ्यांसोबत पोलिसांचाही संताप अनावर झाला.

---

असाही दैवदुर्योग

मन सुन्न करणाऱ्या या प्रकरणात पीडित चिमुकले आहेत. आरोपी चिमुकलीचा बाप अन् चिमुकल्याचा मोठा बाप आहे. तर, या पापाचा बोभाटा करून या नराधमाविरुद्ध तक्रार करणारी पीडित चिमुकल्याची आजी (आरोपीची आई) आहे.

---

Web Title: Begging outside as a third party, abuses the girl at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.