शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वर्धा मार्गावरील बीअरबार फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:59 IST

वर्धा मार्गावरील डोंगरगावचा एक बीअर बार फोडून चोरट्यांनी विदेशी मद्य आणि बीअरच्या बाटल्या लंपास केल्या. बुधवारी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्दे हिंगणा ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा मार्गावरील डोंगरगावचा एक बीअर बार फोडून चोरट्यांनी विदेशी मद्य आणि बीअरच्या बाटल्या लंपास केल्या. बुधवारी ही घटना उघडकीस आली.नागपूर-वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथे अरविंद रमाकांत जयस्वाल (वय ४८, रा. बुटीबोरी) यांचा अंबिका डिलक्स बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या बारमधील स्टाफ रूमच्या दाराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी शोकेसमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या तसेच बीअरच्या बाटल्या असा एकूण १ लाख ३१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी ही घटना उघडकीस आली. बार मालकाने चोरीला गेलेल्या मद्याचे मूल्यांकन करून हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी जयस्वाल यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे, अनेक ठिकाणांच्या वाईन शॉपला सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी नागपुरात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होत असल्यामुळे खबरदारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात वाईन शॉप सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या भागातील बीअर बार तसेच वाईन शॉप फोडून मद्य चोरून नेण्याच्या घटना सारख्या वाढत आहेत. दीड महिन्यात बीअर बार तसेच वाईन शॉप फोडून मद्य चोरून नेण्याची ही नववी घटना आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर