शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:18 IST

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

नागपूर: 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात झालेल्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, निश्चित कारवाई करू, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

माझ्या घरासमोरच पोलीस मुख्यालय आहे. मी पोलिसांना फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. पण यातील आरोपी कुणाशी फोनवर बोलत होते याचा रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल. ते सात तास पोलीस कुणाच्या म्हणण्यावर शांत होते, असा सवाल करीत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली. 

आ. जयंत पाटील यांनी एवढा मोठा हल्ला होणार आहे हे आधी कसे कळाले नाही, पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही,  पालकमंत्र्यांनी स्वतः मागणी करूनही एसआयटी स्थापन का केली नाही, असे सवाल केले. या सर्व घटनेचे समन्वय घडवून आणणारा पप्पू शिंदे हा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे, हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. 

यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी २७८ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ३० जन सराईत गुन्हेगार आहेत. बीड मधील ६१ आरोपी तर माजलगाव मधील ४० आरोपी अद्याप फरार आहेत. सिसी टीव्ही मध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला त्यांनाच अटक केली आहे. हे सर्व नियोजित होते का हे तपासून पाहिले जात आहे. यातील मास्टर माईंड शोधत आहोत व दोषिवर कारवाई करणारच, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर