बीएड ची परीक्षा पुन्हा वांध्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:22+5:302021-03-13T04:14:22+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएड अभ्यासक्रमाच्या उर्वरित दोन विषयांची परीक्षा १८ ते २० मार्च रोजी घेण्याची ...

बीएड ची परीक्षा पुन्हा वांध्यात!
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएड अभ्यासक्रमाच्या उर्वरित दोन विषयांची परीक्षा १८ ते २० मार्च रोजी घेण्याची घोषणा केली. परंतु लॉकडाऊनमुळे पुन्हा परीक्षा वांध्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना भीती आहे की लॉकडाऊनमुळे परीक्षा होणार नाही. विद्यापीठाने स्पष्ट केले की, लॉकडाऊन असले तरी दोन्ही विषयांचा पेपर होईलच.
नागपूर शहरात सर्वाधिक परीक्षा केंद्र हे हॉटस्पॉट ठरलेल्या लक्ष्मीनगर, मंगळवारी, हनुमाननगर व धरमपेठ झोनमध्ये आहे. त्याचबरोबर कामठी, सावनेर, हिंगणा, काटोलमध्येही परीक्षा केंद्र आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा बंद राहील. त्यामुळे तहसीलच्या ठिकाणी असलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा देणे अवघड होईल. त्याचबरोबर सेंटरवर जाण्यासाठीसुद्धा अडचणींचा सामना करावा लागेल.
यापूर्वी विद्यापीठाने बीएडची परीक्षा स्थगित केली होती. हा अनुभव लक्षात घेता, यंदाही परीक्षा रद्द होईल, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे बीएडचा एक पेपर १६ मार्च २०२० रोजी झाला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने पुढचे पेपर स्थगित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये विद्यापीठाने परीक्षा आयोजित केली आहे. परंतु दोन पेपरनंतर परीक्षा पुन्हा स्थगित करण्यात आली.
- परीक्षा होईलच
यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत परीक्षा होईलच. लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम बीएडच्या परीक्षेवर होणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.