आई न मिळाल्याने बछडा गोरेवाड्याच्या बचाव केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:29 IST2018-03-13T20:28:56+5:302018-03-13T20:29:09+5:30

ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. दुर्देवाने पिलाची आईसोबत भेट झाली नाही .

Because of not find mother, calf kept in Gorewada rescue center | आई न मिळाल्याने बछडा गोरेवाड्याच्या बचाव केंद्रात

आई न मिळाल्याने बछडा गोरेवाड्याच्या बचाव केंद्रात

ठळक मुद्देब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात आढळला होता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. पिल्लाची आईसोबत भेट करून देण्यासाठी ७ सदस्यांची टीम वनविभागाने गठित केली होती. त्यासाठी ४५ तासांचा कालावधी दिला समितीने दिला होता. परंतु पिलाची आईसोबत भेट झाली नाही. त्यामुळे ३ मार्च रोजी बछड्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती व पुढील व्यवस्थापनाकरिता गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्रात तात्काळ हलविण्याची विनंती मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना केली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने  गोरेवाड्याच्या बचत केंद्रात दाखल करण्यात आले . बछड्याची काळजी व व्यवस्थापन सहा. प्राध्यापक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र व्ही. एम. धूत यांच्याकडे आहे.

 

Web Title: Because of not find mother, calf kept in Gorewada rescue center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.