तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:33+5:302021-09-10T04:13:33+5:30

खापा : आराेपीने शिवीगाळ करीत तरुणाला जाेराने धक्का दिल्याने खाली पडून ताे जखमी झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या ...

Beating the youth | तरुणास मारहाण

तरुणास मारहाण

खापा : आराेपीने शिवीगाळ करीत तरुणाला जाेराने धक्का दिल्याने खाली पडून ताे जखमी झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदेवाणी शिवारात मंगळवारी (दि.७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

आनंद अभिनाथ डाेंगरे (३०, रा. सिंदेवाणी, ता. सावनेर), असे जखमी तरुणाचे नाव असून, विनाेद प्रभाकर मुर्खे (४०, रा. सिंदेवाणी, ता. सावनेर), असे आराेपीचे नाव आहे. आराेपी हा त्याच्या मित्रासाेबत दारू पीत असताना आनंद तिथे गेला असता, आराेपीने शिवीगाळ करीत आनंदला जाेराने धक्का दिला. यात ताे खाली पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि कलम ३२५, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार प्रमाेद बन्साेड करीत आहेत.

Web Title: Beating the youth