क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST2021-04-23T04:09:47+5:302021-04-23T04:09:47+5:30

नरखेड : क्षुल्लक कारणावरून आराेपीने महिलेला मारहाण करीत जखमी केले. दरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ...

Beating a woman for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण

नरखेड : क्षुल्लक कारणावरून आराेपीने महिलेला मारहाण करीत जखमी केले. दरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेरखैरी येथे बुधवारी (दि.२१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

विजय शंकर कुंभरे (३६, रा. चाेरखैरी, ता. नरखेड) असे अटकेतील आराेपीचे नाव असून, तुळजा राजविलास कुंभरे (४२, रा. चाेरखैरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. आराेपी व जखमी महिला हे दाेघेही भाजीपाला विक्री करतात. घटनेदरम्यान आराेपी व त्याचे मित्र आपसात बाेलत असताना ‘माझ्याबद्दल काहीतरी बाेलत आहे’ व शिवीगाळ करण्याचा आवाज आल्याने महिलेने त्यांना ‘मला शिवीगाळ का करता’ असे विचारले असता, आराेपीने तिच्याशी वाद घालत वजनाच्या दगडाने तिच्या डाेक्यावर प्रहार करून जखमी केले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम ३२५, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक खुटेमाटे करीत आहेत.

Web Title: Beating a woman for trivial reasons