जुन्या वादातून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:07+5:302021-02-05T04:43:07+5:30
कळमेश्वर : जुन्या वादातून भांडण करीत शेजारी राहणाऱ्या दाेघींनी महिलेस मारहाण करीत जखमी केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या ...

जुन्या वादातून महिलेस मारहाण
कळमेश्वर : जुन्या वादातून भांडण करीत शेजारी राहणाऱ्या दाेघींनी महिलेस मारहाण करीत जखमी केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या काेहळी येथे २९ जानेवारी राेजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुनिता कैलास उईके (४३, रा. वाॅर्ड क्र. २, काेहळी, ता. कळमेश्वर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सुनिता ही घरासमाेर पाणी टाकत असताना, शेजारी राहणाऱ्या आराेपी महिलेने तिला ‘घरासमाेर पाणी का टाकते’ असे विचारत वाद घातला. शिवाय, तिने डाेक्याचे केस पकडून धक्काबुक्की करीत सुनिताला खाली पाडले. अशात अन्य दुसऱ्या आराेपी महिलेने तेथे येऊन सुनिताला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. यामुळे आराेपी दाेघींकडून सुनिताला भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस नाईक तभाने करीत आहेत.