गतिमंद मुलाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:08+5:302021-03-04T04:11:08+5:30
गुलमोहरनगर, भरतवाडा भागात निर्मला हरिचंद वर्मा (वय ५०)राहतात. त्यांचा गतिमंद मुलगा सोमवारी सकाळी आपल्या अंगणात बडबड करीत होता. त्याच्या ...

गतिमंद मुलाला मारहाण
गुलमोहरनगर, भरतवाडा भागात निर्मला हरिचंद वर्मा (वय ५०)राहतात. त्यांचा गतिमंद मुलगा सोमवारी सकाळी आपल्या अंगणात बडबड करीत होता. त्याच्या हातात बॅट होती. आरोपी राकेश शाहू आणि हरिकृष्णा शेंडे तेथे आले. त्यांनी मुलाच्या हातून बॅट हिसकावून त्याच बॅटने त्याला मारहाण केली. मुलाच्या पायाला त्यामुळे जबर दुखापत झाली. शेजाऱ्यांनी आरोपींना हटकले त्यानंतर ते निघून गेले. निर्मला वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी दुपारी कळमना पोलिसांनी आरोपी शाहू आणि शेंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---सायकलस्वाराला लुटले
नागपूर - भांडेवाडीलील योगेश बागडे (वय २७) या सायकलस्वाराला वाठोेड्यातदोन आरोपींनी सोमवारी रात्री मारहाण करून खाली पाडले आणि त्याचा मोबाईल हिसकावून पळून गेले. वाठोडा पोलिसांनी या प्रकरणात लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---
सदरमधील कुख्यात मोंटी हद्दपार
नागपूर - कुख्यात गुंड निखील ऊर्फ मोंटी मलिक याला पोलिसांनी एक वर्षाकरिता नागपुरातून हद्दपार केले. तो सदरमधील मरियमनगरात राहतो. त्याची या भागात प्रचंड दहशत आहे.
---