क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:02+5:302021-05-11T04:09:02+5:30

कुही : क्षुल्लक कारणावरून मारहाण करीत एकास जखमी केले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उंद्री येथे शुक्रवारी (दि.७) ...

Beating one for a trivial reason | क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

कुही : क्षुल्लक कारणावरून मारहाण करीत एकास जखमी केले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उंद्री येथे शुक्रवारी (दि.७) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

माेरकू नथ्थूजी कंगाले (३९, रा. उंद्री, ता. उमरेड) असे जखमीचे नाव असून, महादेव इरपाते, रा. उंद्री, ता. उमरेड, असे आराेपीचे नाव आहे. माेरकू कंगाले हा आपल्या घरासमाेरील खाटेवर परमात्माचे गाणे गात हाेता. अशात आराेपी महादेव तिथे आला व परमात्माचे गाणे का म्हणताे, असे विचारत अश्लील शिवीगाळ करीत त्याच्या डाेक्यावर लाकडी काठीने मारहाण करून माेरकूला जखमी केले. याप्रकरणी माेरकू कंगाले यांच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, २९४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुचिता मंडवाले करीत आहेत.

Web Title: Beating one for a trivial reason