जुन्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST2021-09-24T04:09:58+5:302021-09-24T04:09:58+5:30

काटाेल : जुन्या वादातून आराेपीने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केले. ही घटना काटाेल शहरातील रेल्वे स्टेशन ...

Beating one out of an old argument | जुन्या वादातून एकास मारहाण

जुन्या वादातून एकास मारहाण

काटाेल : जुन्या वादातून आराेपीने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केले. ही घटना काटाेल शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी (दि.२२) घडली.

मधुकर ढाेके (५५, रा. काटाेल) असे जखमीचे नाव असून, साैफू अली अकरम अली (३२) असे आराेपीचे नाव आहे. मधुकर ढाेके हे रेल्वे स्टेशन परिसरात काही कामानिमित्त गेले हाेते. दरम्यान, आराेपीने जुन्या वादातून त्यांच्याशी वाद घातला. अशातच आराेपीने हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेनंतर आराेपी तेथून पसार झाला. याबाबत माहिती मिळताच काटाेल पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला काटाेल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात प्रशांत लभाने करीत आहेत.

Web Title: Beating one out of an old argument