सासूला मारहाण, सुनेची छेड काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:04+5:302021-09-10T04:13:04+5:30

............ दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण नागपूर : यशोधरानगरात एक व्यक्ती नातेवाइकांच्या मदतीने मुलाला घेऊन फरार झाल्याची घटना घडली. यशोधरानगर ...

Beating mother-in-law, teasing Sune | सासूला मारहाण, सुनेची छेड काढली

सासूला मारहाण, सुनेची छेड काढली

............

दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण

नागपूर : यशोधरानगरात एक व्यक्ती नातेवाइकांच्या मदतीने मुलाला घेऊन फरार झाल्याची घटना घडली. यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. भुरेसिंह यादव (४०) असे आरोपीचे नाव आहे. भुरेसिंह पत्नी पूजासोबत यशोधरानगराच्या प्रवेशनगरात राहत होता. २१ जुलैला भुरेसिंह आणि हरिसिंह यांनी पूजाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पूजाच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन ते फरार झाले. पूजाच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अपहरण तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

...........

खोलीत मृतावस्थेत आढळला भाडेकरू

नागपूर : सीताबर्डीच्या सोनी लाईनमध्ये भाडेकरूचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. किशोर रमेश गावंडे (४५) हा सोनी लाईनमध्ये किरायाने राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो मूळचा अकोला येथील रहिवासी आहे. येथे तो एकटाच राहत होता. चार महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो सतत नशेत राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने कुटुंबीयांना फोन करून प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. जुन्या साथीदारांनी त्याला औषधीही दिली होती. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. गुरुवारी दुपारी घरमालकाच्या मुलाला दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी किशोरच्या खोलीत पाहिले असता घटनेची माहिती समजली. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना सूचना देण्यात आली. किशोरचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शंका आहे. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

..............

Web Title: Beating mother-in-law, teasing Sune