क्षुल्लक कारणावरून मित्रास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:11+5:302021-09-14T04:12:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : दारू प्यायल्यानंतर मित्राने बसस्टाॅपवर साेडून न दिल्याने त्याला शिवीगाळ व जबर मारहाण करीत गंभीर ...

क्षुल्लक कारणावरून मित्रास जबर मारहाण
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : दारू प्यायल्यानंतर मित्राने बसस्टाॅपवर साेडून न दिल्याने त्याला शिवीगाळ व जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. यातील आराेपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. १२) अटक केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उटी शिवारात गुरुवारी (दि. ९) घडली हाेती.
गाेविंद हरिकिशन दास (२९, रा. गाेविंदपूर, ता. मुलचेरा, जिल्हा गडचिराेली) असे अटकेतील आराेपीचे तर दीपांकर मंडल (३०, रा. अर्जुनी माेरगाव, जिल्हा गाेंदिया) असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते देवेन राय यांच्या साइटवर कामगार म्हणून काम करतात. गाेविंदला भिवापूरला जायचे असल्याने त्याने दीपांकरला माेटारसायकलने बसस्टाॅपवर पाेहाेचवून देण्याची सूचना केली हाेती. वाटेत दाेघेही दारू प्यायले. त्यातच गाेविंदने उटी शिवारात माेटारसायकल थांबविली आणि त्याला गाडीत पेट्राेल नसल्याचे सांगून बसस्टाॅपवर साेडून देण्यास नकार दिला.
चिडलेल्या गाेविंदने दीपांकरला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्यात दीपांकर गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माेबाइल सीडीआरच्या आधारे गाेविंदला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, वीरेंद्र नरड, विनाेद काळे, ज्ञानेश्वर राऊत, शैलेश यादव, सत्यशील काेठारे, प्रणय बनाफर, भाऊराव खंडाते, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.