शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:19 IST

हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिंगणा भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ. ब्रह्मानंद करंजीकर (६४) रा. कॉर्पोरेशन कॉलनी हे वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजचे चेअरमन आहेत. ते शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता कॉलेज परिसरातील बगिच्याच्या कामाचे निरीक्षण करीत होते. दरम्यान आरोपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सचिन शेंडे (३५) तिथे आले. तो करंजीकर यांना दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका अ‍ॅडमिशनसाठी दिलेले पैसे परत करण्याबाबत वाद घालू लागला. वाद वाढल्यावर सचिनने कुठल्यातरी वस्तूने डॉ. करंजीकर यांचा चेहरा व डोळ्याजवळ हल्ला करून जखमी केले. त्यांना शिवीगाळ करीत पाहून घेण्याची धमकी देऊ लागला. दरम्यान डॉ. करंजीकर यांनीही आपल्या कॉलेज कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. फिर्यादी करंजीकर यांच्या तक्रारीरून हिंगण्याचे एएसआय सुनील भांडेगावकर यांनी आरोपी सचिनविरुद्ध मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला.दुसरीकडे फिर्यादी सचिन शेंडे रा. महाजन वाडी याच्यानुसार तो कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनचे पैसे भरायला आला होता. त्याचा जुन्या पैशावरून डॉ. करंजीकराशी वाद झाला. आरोपी करंजीकर व प्रा. गंगवानी यांनी आणखी ५ ते ६ लोक यांनी मिळून सचिनला मारहाण केली. आरोपींनी सचिनची बाईक क्रमांक (एमएच/३१/सीडब्ल्यू/४८२९) ची तोडफोड केली. सचिनच्या तक्रारीवरून डॉ. करंजीकर , प्रा. गंगवानी व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध मारहाण व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी