रस्त्याच्या वादातून दाेघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:26+5:302021-05-11T04:09:26+5:30

बुटीबाेरी : शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून आराेपी पती-पत्नीने दाेघांना मारहाण करीत जखमी केले. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Beaten up by road disputes | रस्त्याच्या वादातून दाेघांना मारहाण

रस्त्याच्या वादातून दाेघांना मारहाण

बुटीबाेरी : शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून आराेपी पती-पत्नीने दाेघांना मारहाण करीत जखमी केले. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळापाणी शिवारात शनिवारी (दि. ८) घडली.

पुरुषाेत्तम साेमाजी सिरसाम (३८) व साेमाजी सिरसाम, रा. जांभळापाणी, ता. उमरेड अशी जखमींची नावे असून, शेषराव सिरसाम व त्याची पत्नी अशी आराेपींची नावे आहेत. जखमी व आराेपींची शेती आजुबाजूला असून, शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद आहे. घटनेच्या दिवशी पुरुषाेत्तम हा शेतात काम करीत असताना आराेपी शेषराव तेथे आला व तू रस्ता का खाेदला, या कारणावरून शिवीगाळ करून घरी निघून गेला. काही वेळाने शेषराव आपल्या पत्नीसह तेथे आला व शिवीगाळ करीत त्याने पुरुषाेत्तमच्या वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केले. पुरुषाेत्तम हा मध्ये पडला असता, आराेपीच्या पत्नीने तिच्याकडील मिरची पावडर पुरुषाेत्तमच्या डाेळ्यात टाकून त्याच्या डाेक्यावर काठीने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी फिर्यादी पुरुषाेत्तम सिरसाम यांच्या तक्रारीवरून आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार धवराळ करीत आहेत.

Web Title: Beaten up by road disputes