आॅनलाईन लोकमतनागपूर : माझ्याशी लग्न केले नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देऊन एका तरु णाने त्याच्या ओळखीच्या तरु णीला मारहाण केली. रितेश पदमवार (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो नंदनवनमधील हसनबागमध्ये राहतो.नंदनवनमध्येच राहणाºया एका तरु णीसोबत (वय १९) त्याची अनेक दिवसांपासून ओळख आणि बातचित आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तिला प्रपोज केले. तिने लग्नास नकार देऊन हळूहळू त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे रितेश संतप्त झाला. रविवारी रात्री ९.१५ वाजता ती आपल्या घरात टीव्ही बघत असताना रितेश तेथे आला. यावेळी तरु णीची आई स्वयंपाक करीत होती. तर, तिचा भाऊ बाहेर होता. रितेशने तिचा हात पकडून तिला घराबाहेर आणले. तू माझ्याशी बोलत का नाही, असा प्रश्न करून रितेशने तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. तिने दाद दिली नाही. त्यामुळे रितेशने तिच्या कानशिलात लगावून तिला अश्लील शिवीगाळ केली. बाजूचा दगड उचलून तिला धमकावले. माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकीही दिली. आरडाओरड ऐकून तरु णीचा भाऊन आणि आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपीने पळ काढला. तरु णीने या प्रकाराची तक्र ार नंदनवन ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी रितेशविरु द्ध मारहाण करणे, विनयभंग करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
लग्न करण्यासाठी तरुणीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:54 IST
माझ्याशी लग्न केले नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देऊन एका तरु णाने त्याच्या ओळखीच्या तरु णीला मारहाण केली. रितेश पदमवार (वय २६) असे आरोपीचे नाव आहे.
लग्न करण्यासाठी तरुणीला मारहाण
ठळक मुद्देदगड उचलून धमकावलेअश्लील शिवीगाळ केली