चहापत्ती वितरकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST2021-06-04T04:07:21+5:302021-06-04T04:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चहापत्ती वितरकाला मारहाण करून आणि त्याच्या वाहनचालकाला दमदाटी करून चौघांनी जबरदस्तीने चहापत्तीच्या ...

Beat the tea leaf distributor | चहापत्ती वितरकाला मारहाण

चहापत्ती वितरकाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चहापत्ती वितरकाला मारहाण करून आणि त्याच्या वाहनचालकाला दमदाटी करून चौघांनी जबरदस्तीने चहापत्तीच्या २० पेट्या उतरवून घेतल्या. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. ओमप्रकाश गंगाधर गणार (वय ४५, रा. पारडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जून च्या सायंकाळी ६ च्या सुमारास ते आणि चहापत्ती वितरक नितीन पारसमल ओसवाल जरीपटक्यात चहापत्तीचा माल पोहोचवण्यासाठी गेले होते. तेथे आरोपी विमल काचेला त्याच्या तीन साथीदारांसह वाहनातून आला. त्याने ओसवाल यांचे वाहन रोखून चहापत्तीची मागणी केली. आधी जुनी रक्कम चुकती करा, नंतर माल देतो, असे ओसवाल यांनी म्हटले. त्यावरुन आरोपी काचेला आणि साथीदारांनी त्यांच्याशी वाद घालून लाकडी दांड्याने ओसवाल यांना मारहाण केली. त्यामुळे ते घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी गणार यांना धाक दाखवून त्यांच्याकडून वाहनाची चावी घेतली आणि वाहनातून चहापत्तीच्या २० पेट्या जबरदस्तीने उतरवून घेतल्या. आरोपी निघून गेल्यानंतर गणार आणि ओसवाल जरीपटका पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Beat the tea leaf distributor