समाजाच्या विकासासाठी एकसंघ व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:14+5:302021-02-09T04:09:14+5:30
कामठी : समाजाच्या विकासासाठी तरुणांनी एकसंघ व्हावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार उभारावा. यासोबतच समाजातील उपेक्षित घटकांना मदत ...

समाजाच्या विकासासाठी एकसंघ व्हा
कामठी : समाजाच्या विकासासाठी तरुणांनी एकसंघ व्हावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार उभारावा. यासोबतच समाजातील उपेक्षित घटकांना मदत करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. गादा येथील द्वारकाधीश मंदिरात रविवारी सर्वशाखीय कुणबी समाज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी आमदार देवराव रडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, शरद निंबाळकर, रवींद्र भुयार, हर्षल काकडे, राजेश काकडे, नरेंद्र जिचकार, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश काकडे यांनी केले. संचालन नरेंद्र जिचकार यांनी तर आभार अवंतिका लेकुरवाळे यांनी मानले.