जीएसटी रिटर्न्स भरताना सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:27 IST2017-10-09T01:27:26+5:302017-10-09T01:27:37+5:30
प्रारंभीच्या टप्प्यात जीएसटी कायद्यातील तरतुदी आणि पद्धती सदस्य आणि डीलर्सला समजून घेण्याची गरज आहे. फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धती जाणून घेणे एक आव्हानात्मक काम आहे.

जीएसटी रिटर्न्स भरताना सावध राहा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रारंभीच्या टप्प्यात जीएसटी कायद्यातील तरतुदी आणि पद्धती सदस्य आणि डीलर्सला समजून घेण्याची गरज आहे. फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धती जाणून घेणे एक आव्हानात्मक काम आहे. कायद्यात सुधारणा किंवा फेरबदलासाठी मर्यादित संधी उपलब्ध असल्यामुळे सीएंनी जीएसटी रिटर्न्स सावधतेने भरावे, असे आवाहन सीए रितेश मेहता यांनी येथे केले.
वस्तू व सेवा करातील तरतुदी आणि विभिन्न पद्धतीची माहिती करून देण्यासाठी आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे धंतोली येथील सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सीए नागपूर शाखेचे अध्यक्ष संदीप जोतवानी, आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य सीए अभिजित केळकर, सीए जितेन सागलानी आणि सीए ओमप्रकाश अग्रवाल उपस्थित होते.
रितेश मेहता यांनी जीएसटी रिटर्न भरण्याच्या जीएसटी-१, आर-२, आर-३ आणि ३ बी अशा विविध विषयांवर माहिती दिली. मेहता म्हणाले, जीएसटी-३ बी फॉर्म हा सारांश स्वरूपात असून त्यात बाह्य आणि आतील पुरवठ्याचे एकत्रित तपशील नमूद करणे आवश्यक आहे. जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट जीएसटी नियमानुसार निर्धारित पद्धतीने बाह्य कर देयताविरूद्ध पद्धतशीर समायोजित करणे आवश्यक आहे. जीएसटी रिटर्न्स भरताना त्यांनी विविध तांत्रिक अडथळ्यांवर प्रकाश टाकला.
संदीप जोतवानी म्हणाले, जीएसटी कायद्यातील तरतुदी अत्यंत सोईच्या असल्यामुळे डीलर्स कायद्याचा अवलंब करेल. जीएसटी रिटर्न भरणे सोपे नसून त्यासाठी कायद्याचा अनुभव व ज्ञान असणे आवश्यक आहे. ओमप्रकाश अग्रवाल म्हणाले, सीएंना जीएसटी आर १, आर २ आणि आर ३ भरताना अडचणी येत आहेत. जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत अनेकदा वाढविल्यामुळे सर्वांमध्ये संभ्रम आहे. पुढे सीएंसमोर सर्व प्रकारातील अनेक आव्हाने उभी राहणार आहे. वेळेवर रिटर्न भरण्यासाठी व्यापाºयांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. जितेन सागलानी यांनी समन्वयन केले. यावेळी सीए सतीश सारडा, जय पोपटानी, सतीश लद्धड आणि सीए मोठ्या संख्येने उपस्थित होते.