सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची दहशत कमी होत नाही तोच स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. सध्या सहा रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. २०१८ मध्ये या आजाराचे १५५ रुग्ण आढळून आले होते. तर २९ रुग्णांचा जीव गेला होता. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व तो लांबत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.'चिगर माइट्स'मधील 'ओरिएन्शिया सुसुगामुशी' जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने 'स्क्रब टायफस' होतो. हे 'माईट्स' उंदराच्या शरीरावर चिकटून राहतात, त्याच्या रक्तावर वाढतात. पावसाळ्याच्या दिवसात उंदराच्या बिळात पाणी शिरले की ते बिळाबाहेर येतात. त्यांच्या शरीरावरील 'माइट्स' हे उंच गवत, शेतात, झाडी-झुडपात पसरतात. या जीवाणूच्या संपर्कात जी व्यक्ती येते त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. मानवी शरीरातील पेशींना ते द्रवरूपात रूपांतर करून ओढून घेतात. त्यांच्यातील 'ओरिएन्शिया सुसुगामुशी' जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. चावण्याच्या ठिकाणी दुखत नाही. यामुळे काही चावल्याचे भान राहत नाही. चावलेल्या ठिकाणी व्रण येतो. ज्याला 'इशर' म्हणतात. हा 'इशर' या आजाराची ओळख आहे. परंतु सर्वांमध्ये 'इशर' दिसूनच येईल, असे नाही. या आजारावर औषधी नाही. यामुळे तातडीने निदान होऊन उपचार घेणे आवश्यक असते.५० टक्के रुग्णांना मृत्यूचा धोकास्क्रब टायफसच्या ५० टक्के रुग्णांना यकृतासह न्युमोनियाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, कावीळ व श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असतो. साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. अनेकांच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी कमी होतात. योग्य उपचार मिळाले नाही, तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.ही आहेत लक्षणेया आजारात सुरुवातीला ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलट्या, चालताना तोल जाणे, लालसर पुरळ येणे आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षणे आढळतात. परंतु ४० टक्के लोकांमध्ये ही लक्षणे दिसतीलच असे नाही. यामुळे रुग्ण गंभीर होण्यापूर्वीच ही लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला 'डॉक्सिसायक्लिन' किंवा 'टिट्रासायक्लीन' गोळ्या दिल्या जातात.रुग्णांची प्रकृती स्थिरसध्या रुग्णालयात 'स्क्रब टायफस'चे सहा रुग्ण उपचार घेत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. स्क्रब टायफसचे लवकर निदान व उपचार मिळाल्यास मृत्यूचा धोका कमी होतो.-डॉ. राजेश गोसावीप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल
सावधान! परत येतोय स्क्रब टायफस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:01 IST
Health Scrub typhus या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व तो लांबत असल्याने स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सावधान! परत येतोय स्क्रब टायफस
ठळक मुद्देमेडिकलमध्ये सहा रुग्णांची नोंद २०१८ मध्ये २९ जणांचा घेतला होता बळी