बसोलीच्या कोलाज चित्र स्पर्धा ‘पेपर कट पोएट्री’चे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:23+5:302021-05-27T04:09:23+5:30

नागपूर : बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपने लॉकडाऊन काळात बालचित्रकारांसाठी घेतलेल्या ‘पेपर कट पोएट्री’ या आपल्या आठव्या ऑनलाईन बाल कोलाज चित्र ...

Basoli's collage drawing competition 'Paper Cut Poetry' results announced | बसोलीच्या कोलाज चित्र स्पर्धा ‘पेपर कट पोएट्री’चे निकाल जाहीर

बसोलीच्या कोलाज चित्र स्पर्धा ‘पेपर कट पोएट्री’चे निकाल जाहीर

नागपूर : बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपने लॉकडाऊन काळात बालचित्रकारांसाठी घेतलेल्या ‘पेपर कट पोएट्री’ या आपल्या आठव्या ऑनलाईन बाल कोलाज चित्र स्पर्धेचे निकाल जाहीर केले आहे. या स्पर्धेत नागपूर, सातारा, मुंबई, दिल्ली, कोल्हापूर, पुणे, वडोदरा, खामगाव, ठाणे व जर्मनीच्या स्पर्धकांनी बाजी मारली.

स्पर्धेत भारतासह जर्मनी, अमेरिका, इंग्लंड येथून ६५४ बालचित्रकार सहभागी झाले होते. ५ ते ९ व १० ते १६ अशा वयोगटात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर व लेखनकार अच्युत पालव यांनी केले.

---------------

स्पर्धेचा निकाल

‘अ’ गट :

प्रथम - इरावती हरोलीकर, आदित्य ढवरे, सौमित्र डोळस, ऐशानी सक्सेना

विशेष प्रमाणपत्र - आरोही पाटील, अंबरा कडू, देव शर्मा, द्रुनिल सुखदेवे, पर्णिका पवार, राधा दातार, रसिका कुशवाह, शौनक गोडबोले, शुभम मस्के, वरुणिका बोडखे

‘ब’ गट :

प्रथम - आदित्य फडतरे, मंदार लोहार, निपुण निस्ताने, पूर्णा देशमुख

विशेष प्रमाणपत्र - अनन्या हुमाने, नभा इरंडोलकर, निलांशू हाडके, पिनाक वरखेडकर, प्रिशा भुरके, रोहिणी देहाडराय, सायली इंगळे, श्रीजी नेगी, वैष्णवी चिमरकर, वेदिक चुघ.

................

Web Title: Basoli's collage drawing competition 'Paper Cut Poetry' results announced