‘मून’च्या कार्यक्रमात बासित का सहभागी झाले नाहीत?

By Admin | Updated: June 10, 2016 02:51 IST2016-06-10T02:51:06+5:302016-06-10T02:51:06+5:30

पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित नागपूर दौऱ्याप्र्रसंगी प्रतिरूप (मॉक) संयुक्त राष्ट्राच्या ‘मून’ या कार्यक्रमात सहभागी होणार होते.

Basit did not participate in 'Moon' program? | ‘मून’च्या कार्यक्रमात बासित का सहभागी झाले नाहीत?

‘मून’च्या कार्यक्रमात बासित का सहभागी झाले नाहीत?

नागपूर : पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित नागपूर दौऱ्याप्र्रसंगी प्रतिरूप (मॉक) संयुक्त राष्ट्राच्या ‘मून’ या कार्यक्रमात सहभागी होणार होते. यात पाकिस्तानचे १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. परंतु बासित या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यामुळे ते उपस्थित का झाले नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिरूप संयुक्त राष्ट्रसंघ वास्तविक संयुक्त राष्ट्रसंघाचाच एक भाग आहे. यातून विद्यार्थी एकत्र येतात व जगभरातील घडामोडीवर सामूहिक चर्चा करतात. त्यामुळे बासित या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. एका वेब पोर्टलला दिल्ली येथील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, आयोजकांच्या दबावामुळे बासित यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आयोजकांनी याचा इन्कार केला आहे. ही विद्यार्थ्यांची संघटना असल्याने क ोणत्याही दबावाचा प्रश्नच येत नाही. हा कार्यक्रम अगोदरच निश्चित झाला होता. बासित यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ई-मेलव्दारे निमंत्रित केले होते. त्यांनी याला होकारही दिला होता, अशी माहिती नागपूर शाखेचे ॠतिक जोशी यांनी दिली.बासित यांच्या नागपूर आगमनापूर्वी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने नागपुरात राहण्याची व्यवस्था आहे का, अशी विचारणा आयोजकांना केली होती. या संदर्भात आम्ही असमर्थता व्यक्त केली होती. हा कार्यक्रम एका कॉलेजतर्फे आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली होती.त्यामुळे बासित कार्यक्रमाला आले नाहीत.

Web Title: Basit did not participate in 'Moon' program?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.