मेट्रोने हटविले रस्त्यावरील बॅरिकेट्स

By Admin | Updated: August 12, 2016 02:49 IST2016-08-12T02:49:28+5:302016-08-12T02:49:28+5:30

अजनी रेल्वेस्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यावरील मार्गात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले आणि मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स

Barricades on the road removed by Metro | मेट्रोने हटविले रस्त्यावरील बॅरिकेट्स

मेट्रोने हटविले रस्त्यावरील बॅरिकेट्स

नागरिकांना दिलासा : वाहतुकीस होता अडथळा
नागपूर : अजनी रेल्वेस्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यावरील मार्गात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले आणि मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स गुरुवारी सकाळी हटविण्यात आले. या बॅरिकेट्सवर ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे लिहिले होते. परंतु प्रत्यक्षात येथे कोणतेही काम सुरू नव्हते.
‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘माझी मेट्रो’चा रस्त्यावर ताबा या शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. अजनी रेल्वेस्थानक ते धंतोली पोलीस ठाण्यादरम्यान कुठलेही काम सुरू नसताना हे बॅरिकेट्स लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यात सर्वाधिक त्रास रुग्णांना होत होता. धंतोली परिसरात अनेक रुग्णालय आहेत. या रस्त्यावरून अनेक रुग्णवाहिका ये-जा करतात. बुधवारी दुपारी एक बस या रस्त्यावरून जाताना अडकून पडल्याची बाब लोकमतच्या चमूच्या निदर्शनास आली. तेथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. एक रुग्णवाहिकाही या बसच्या मागून येत असल्यामुळे ती सुद्धा अडकून पडली होती. ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने ही बाब गंभीरपणे घेऊन रस्त्यावरील बॅरिकेट्स हटविले आहेत.(प्रतिनिधी)



पाहणीसाठी पोहोचले अधिकारी
गुरुवारी सकाळी एनएमआरसीएलचे उपमहाव्यवस्थापक शिरीष आपटे, सुरक्षा सल्लागार अरविंद गिरी संबंधित स्थळी पोहोचले. त्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर तेथील बॅरिकेट्स हटविण्याच्या सूचना दिल्या.

 

Web Title: Barricades on the road removed by Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.