शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

राज्यात पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक सर्जरी; नागपूरच्या मेडिकल शल्यक्रिया विभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 07:00 IST

Nagpur News ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार; परंतु त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत पहिल्यांदा मेयो आणि नंतर मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने ‘बेरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देतब्बल ८०० व्यक्तींचा लठ्ठपणा केला दूर

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार; परंतु हा एक आजार असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. परिणामी त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत पहिल्यांदा मेयो आणि नंतर मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने ‘बेरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मागील १२ वर्षांत ८००वर रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करीत त्यांचा लठ्ठपणा दूर केला. विशेष म्हणजे, लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सर्वांत प्रथम डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेला सुरुवात केली. (Bariatric surgery at a government hospital for the first time in the state)

भारतात जंक फूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. अनियंत्रित वजनामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, ॲथरोस्केरासिस, आदी आजारांचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) दरवर्षी २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्तींचा या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने मृत्यू होतो. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे, तर ७.४१ टक्के लोक कर्करोगामुळे बळी पडतात. सर्वाधिक लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. याची गंभीर दखल घेत मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मेयो आणि मेडिकल मिळून ८०० वर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

१८४ किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेडिकलमध्ये आतापर्यंत झालेल्या बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेमध्ये सर्वाधिक वजनाच्या म्हणजे, १८४ किलो वजनी ५८ वर्षीय पुरुषावर बेरिॲट्रिक सर्जरी डॉ. गजभिये यांनी नुकतीच यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर या पुरुषाचे वजन ८५ किलो झाले असून, या शस्त्रक्रियेमुळे तब्बल ९९ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत आहेत.

- शस्त्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग

डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘बेरिॲट्रिक सर्जरी’मध्ये डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे यांच्यासह बधिरीकरण विभाग, निवासी डॉक्टर व परिचारिकांचे सहकार्य मिळत आहे.

- लवकरच रोबोटिक बेरिॲट्रिक सर्जरी 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण ‘बेरिॲट्रिक सर्जरी’कडे वळू लागले आहेत. हीच शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे जास्तीत जास्त २ सेंटिमीटरचा चिरा देऊन होत आहे. यामुळे शस्त्रक्रियेनंतर व्रण दिसून येत नसल्याने महिलांना याचा फायदा होत आहे. मेडिकलमध्ये लवकच रोबोटिक यंत्र उपलब्ध होणार आहे. यामुळे बेरिॲट्रिक सर्जरी आणखी अचूक होईल.- डॉ. राज गजभियेप्रमुख, शल्यक्रिया विभाग, मेडिकल

- मेडिकलमधील बेरियाट्रिक सर्जरी अनेकांसाठी वरदानमेडिकलमधील शल्यक्रिया विभागात दिवसेंदिवस ‘बेरिॲट्रिक सर्जरी’ची संख्या वाढत आहे. ही ‘सर्जरी’ अनेकँसाठी वरदान ठरत आहे. या विभागाला आणखी अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्य