शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

अनवाणी पायांसाठी ते झाले ‘चप्पलदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:33 IST

अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे गप्प बसण्यापेक्षा भर उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्यांसाठी ते चप्पल देणारे दूत म्हणून सेवा देऊ लागले.

ठळक मुद्देबेवारस, निराधार, वंचितांना आधार : दुपट्टे, टोपी व पाण्याचेही वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमानात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. रणरणत्या उन्हात फिरताना जीव कासावीस होतो व माणूस सावलीसाठी धडपडत असतो. अशा ४५ डिग्री तापमानात चपला न घालता घराच्या अंगणात जरी जा म्हटले तरी कुणाचाही तीळपापड होईल. विचार करा, अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे गप्प बसण्यापेक्षा भर उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्यांसाठी ते चप्पल देणारे दूत म्हणून सेवा देऊ लागले.सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष अटलोए, पीएसआय कैलास कुथे, अजित शाह आणि लाचलुचपत विभागातील एक वरिष्ठ अधिकारी यांनी अशा वंचित घटकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात ही मोहीमच सुरू केली आहे. विविध ठिकाणी अनवाणी पायाने रखरखते उन सहन करून जगण्याची लढाई लढणारे अनेक बेवारस, निराधार, वंचित घटक व मनोरुग्ण बांधव फिरताना आपल्या नजरेस पडतात. एकीकडे गगनचुंबी इमारतीमध्ये विलासी आयुष्य जगणारे तर दुसरीकडे नशिबात आलेल्या दारिद्र्याचे चटके सहन करणारे हे वंचित घटक. या चार सहकाऱ्यांना या दैनावस्थेकडे दुर्लक्ष करणे शक्य झाले नाही. या वंचितांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालता यावी म्हणून भरदुपारी शहरातील रस्त्यांवर अनवाणी पायाने फिरणाऱ्यांना नवीन चप्पल, दुपट्टे, टोपी आणि थंड पाणी देण्याचे सेवाभावी काम त्यांनी सुरू केले.या चौघा सहकाऱ्यांपैकी कुणीही दररोज दुपारी १ ते ४ वाजताच्या दरम्यान अशा निराधारांना शोधत शहरातील रस्त्यांवर फिरतात. आज हा परिसर तर उद्या दुसरा. गाडीत आवश्यक ते वाटपाचे साहित्य टाकून रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिरे, वस्त्या, रस्ते, उद्याने असे सर्व हे सहकारी पिंजून काढत आहेत. गरीब असो, भिकारी असो की मनोरुग्ण असो, अशा पायात चप्पल नसलेल्या सर्वांना चप्पल देण्याचे काम ते करतात. सोबत दुपट्टा, तहान लागली तर पाणी आणि भूक लागली तर खाद्य देण्याचेही काम केले जाते. डॉ. अटलोए सांगतात, गेल्या तीन वर्षापासून उन्हाळा सुरू झाला की आमची मोहीम सुरू होते. यावर्षी आतापर्यंत ९५ लोकांना आम्ही चप्पल व इतर साहित्य दिले आहे.अशीही सामाजिक बांधिलकीकेवळ चप्पल वितरणाचेच काम नाही तर कडाक्याच्या थंडीत अशा गरीब, निराधार व बेवारस लोकांना ब्लँकेट वाटपाचे कामही डॉ. अटलोए करीत असतात. गेल्या पाच वर्षापासून ब्लँकेट देण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे. रात्री रस्त्यावर फिरायचे व थंडीत कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर ब्लँकेट घालायचे. यामुळे त्यांना ब्लँकेट दूतही म्हटले जाते. याशिवाय पावसाळ्यात छत्र्या, गरिबांच्या घरांसाठी ताडपत्री, पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. यासोबतच गरजवंतांना शासकीय योजनेतून वैद्यकीय मदत मिळवून देणे, योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करणे हे त्यांचे नित्याचे काम. स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेले आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवित आहेत. भिकाऱ्यांना रोजगारासाठी राबविणार उपक्रमरोजगार मिळवून स्वाभिमानाने जगण्याची इच्छा बाळगणाऱ्यां निराधार व भिकाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार डॉ. अटलोए यांनी केला आहे. छत्र हिरावलेले निराधार व रोजगाराची इच्छा बाळगणाऱ्या भिकाऱ्यांना वजनकाटा देणे, मंदिरासमोर फुले, तेल किंवा इतर आवश्यक साहित्याची दुकाने लावून देण्यास मदत करणार असल्याचे सांगत आजपासूनच ही मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :social workerसमाजसेवकnagpurनागपूर